श्रीगोंदा,दि.१४ :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लहुजी समाज सेवा मंडळाच्यावतीने प्रथमच शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे गुरुवारी(१२)रोजी राहुल दादा जगताप (मा.आमदार) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.मागासवर्गीय वसतिगृह काही दिवसांतच मुलांसाठी उपलब्ध होणार आहे.या मागासवर्गीय वसतिगृहासाठी राहुल दादा जगताप व घन:शाम अण्णा शेलार यांनी मदत करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी घन:शाम अण्णा शेलार (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),राहुलदादा जगताप(मा.आमदार),सुभाष दादा डांगे,भगवानराव गोरखे (संस्थापक,शरदचंद्रजी पवार साहेब मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह)कपिल उल्हारे सर,प्रशांत शिंदे,चंद्रकांत सकट,विनायक ससाणे,बापू गायकवाड,उमेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.
घन:शाम अण्णा शेलार बोलताना म्हणाले की,या वसतीगृहामुळे श्रीगोंदा तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांची श्रीगोंदा शहरात शिक्षण घेण्याची सोय होणार आहे. अनेक हुशार, होतकरू विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र, राहण्याची सोय नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या शरदचंद्रजी पवार मागासवर्गीय वसतीगृहामुळे त्यांच्या राहण्याची अडचण दूर होणार असून अनेक मागासवर्गीय मुलांना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे.
या वसतिगृहासाठी पाच लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. अभ्यासिका, भोजनालय, कॉमनरूम, वैद्यकीय सुविधा या वसतिगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही दिवसातच या वसतिगृहाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील काही दिवसात हे वसतिगृह उपलब्ध होऊ शकेल,असे शरदचंद्रजी पवार मागासवर्गीय वसतिगृहाचे संस्थापक भगवानराव गोरखे यांनी सांगितले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे