पुणे, दि.३० :- अलंकार पोलीस ठाण्य हद्दीतील सराईत गुंडाला पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.मंदार ऊर्फ नाना मनोहर गरुड.वय -३१ वर्षे , रा .२१२ / ७ गणेशनगर मेहेंदळे गॅरेजमागे , तीनचाळ , पुरग्रस्त वसाहत , एरंडवणा , असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
आहे.मंदार ऊर्फ नाना गरुड हा त्याच्या गुंड साथीदारासह स्वत:जवळ घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे तपासात आढळून आले. अलंकार पोलिसांनी त्याच्या तडीपाराची प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांना सादर केला होता.त्याची पडताळणी करुन त्यांनी मंदार ऊर्फ नाना गरुड. याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे. नागरीकांना तडीपार इसम दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आव्हान पुणे शहर पोलिसांनी केले आहे.