पुणे दि २२ :- पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने मौजमजेसाठी वाहने चोरल्याचा प्रकार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी समोर आणला आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.मुलगा सांगवी परिसरात राहतो.
तो एका स्कूलमध्ये शिक्षण घेतो.दरम्यान एस. बी. रोडवर पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरीला गेली होती.याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्याचा चतुःश्रृंगी पोलिस तपास पोलीस करत होते. यावेळी पोलीस कर्मचारी तेजस चोपडे यांना ही मोपेड सांगवी येथील मुलाने चोरली असल्याचे समजले.त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.सखोल तपास केला असता त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणत 3 दुचाकी जप्त केल्या आहेत.मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.व विधी संघर्षीत बालकाकडून पोलिसांनी तीन मोटार सायकल , असा एकुण किंमत रूपये १ लाख ५०हजार रुपयेचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आलेला आहे . सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर , पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग पुणे शहर मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दादा गायकवाड , पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , महेश भोसले व पोलीस अंमलदार तेजस चोपडे , श्रीकांत वाघवले , प्रकाश आव्हाड , ज्ञानेश्वर मुळे , सुधाकर माने , इरफान मोमीन , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , मुकुंद तारू , दिनेश गडांकुश , आशिष निमसे , अमोल जगताप यांच्या पथकाने केली आहे.सदर प्रकरणी पुढील अधिक तपास पोउनि मोहनदास जाधव हे करीत आहेत .