पुणे दि २२ :- तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. २० जून रोजी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २६ पैशांंनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.२८ रुपये असणार आहेत.तर डिझेलच्या दरातही २७ पैसे लिटरमागे महागले आहे. डिझेलचा आजचा दर ९३.९० रुपये लिटर झाला आहे.पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहेपॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.९७ रुपये झाला आहे. गेल्या मे महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ जून पासून २२ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ३.१३ रुपयांनी महागले आहे.