कर्जत दि १२ :-कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये २ अनोळखी इसम कोरोना पेशंटच्या जवळ जाऊन काही तरी बोलण्याचा बहाणा करून पेशंट जवळील मोबाईल घेऊन पसार झाले.त्यानंतर पेशंटच्या लक्ष्यात आले की आपला मोबाईल कोणीतरी अज्ञाताने चोरून नेला.हे समजल्यावर त्यांचे नातेवाईक आणि त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर इसमांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता चोरी केलेली कबुली देऊन मोबाईल त्यांच्याकडे मिळून आला.
मोहन भापचंद साबळे,रा.भांडेवाडी,कर्जत,रमेश राजेंद्र माने,रा.सहकारी बँकेच्या मागे कर्जत अशी अटक केलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.त्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, किरण साळुंखे, पोलीस अंमलदार महादेव गाडे, अस्मिता शेळके, शाहूराज टिकते, नितीन नरुटे, होमगार्ड आरिफ पठाण,शंकर निकत यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे