पुणे दि १३ :-प्रभागातील विकासकामे,सभागृहातील भाषणे,वेळप्रसंगी आंदोलने,मोर्चे अश्या राजकीय जीवनात समर्थपणे काम करणारे आबा बागूल आज आपल्या लग्नाच्या 41 व्या वाढदिवशी तब्बल दोन हजार लोकांचा स्वयंपाक पत्नी व सुनांसह स्वतः करून गरीब व गरजूंना घरपोच डबे पोहोच करण्याचे अनोखे चित्र जेष्ठ नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व जयश्री बागूल यांच्या रूपाने आज दिसून आले. निमित्त होते त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस! शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लर्निंग स्कूलमध्ये स्वयंपाकाचा हा सारा बेत जमला. नगरसेवक आबा बागुल पत्नी सौ जयश्री बागूल तसेच हर्षदा व दीपा या सुना यांसह त्यांनी तब्बल 2000 लोकांचा रुचकर स्वयंपाक सकाळी 9 ते 12 या वेळेत केला . एवढेच नव्हे तर बिर्याणी आणि कोशिंबीरचे 2000 डबे भरण्यास ही मदत
केली. यानंतर कार्यकर्त्यांच्या मदतीने हे 2000 डबे होम क्वारंटाईन, गरीब व गरजूंच्या घरी पोहोच करण्यात आले. याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जया किरड, भाजपचे जेष्ठ नगरसेवक प्रसन्न जगताप अश्यानी तेथे या स्वतः स्वयंपाक करण्याच्या आबा बागुल यांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यावेळी म्हणाले की, असा उपक्रम पुणे शहरात कोणीच करत नाही.आबा बागुलांकडे जबरदस्त इच्छाशक्ती आहे त्यामुळेच हे घडू शकते असे ते म्हणाले. अतिशय प्रेरणा देणारा हा उपक्रम केल्याबद्दल नगरसेवक प्रसन्न जगताप यांनीही त्यांचे कौतुक केले. कोणतीही गर्दी न करता कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून मास्क व सॅनित्यझेर वापरात हा आगळा वेगळा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम पार पडला. बागूल म्हणाले की, गेले १९ दिवस कोरोना काळात परिसरातील होम क्वारंटाईन, गरीब व गरजु ,हातगाडीवाले, फेरीवाले,रिक्षावाले व हातावरचे पोट असलेल्या अश्या २००० नागरिकांना रोज डबे पोहोच केले जातात. लग्नाच्या ४१ व्या वाढदिवसा निमित्तमात्र पत्नी व सुनांसह स्वतः 2000 लोकांचा स्वयंपाक तयार केला. एवढेच नव्हे तर बिर्याणी व कोशिंबीर चे 2000 डबे भरण्यातही मदत केली. आणि अमित बागूल व हेमंत बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या प्रमाणे कार्यकर्त्यांच्या मदतीने डबे 2000 लोकांच्या घरी दुपारी 12 ते 2 या वेळेत पोहोच केले. हा उपक्रम पुढेही चालू राहणार आहे.
कोरोना काळात होम क्वारंटाईन,गरीब व गरजू नागरिकांना मदत करण्याच्या भावनेतून हा उपक्रम सुरू असून हे माझे कर्तव्य आहे हे समजून मी, पत्नी जयश्री व सर्व बागूल कुटुंबीय नागरिकांची सेवा करत आहे. दररोज 2000 नागरिकांना जेवण माझ्याकडून दिले जाते हे मी माझे भाग्य समजतो. पत्नी व कुटुंबासह एवढ्या लोकांचे जेवण बनवण्याचा आनंद मिळाला याच्या सारखा लग्नाचा वाढदिवस दुसरा नाही.
जयश्री ताई म्हणल्या की, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी जनतेसाठी काम करण्याचा आनंदच वेगळा असून ते भाग्य मला मिळाले याचा आनंद आहे.आबा बागुल व बागूल कुटुंबीयांतर्फे दरवर्षी विनामूल्य काशी यात्रेचे आयोजन केले जाते. गेल्या 17 वर्षात 26 वेळा विनामूल्य काशी यात्रा आयोजित झाली त्यातील प्रत्येक वेळी वाराणसी (काशी) येथे सुमारे 2000 वयोवृद्ध माता पिता भाविकांसाठी आबा बागुल व त्यांची पत्नी सौ जयश्री बागूल व सुना स्वतःच्या हाताने 2000 व्यक्तींचा स्वयंपाक करून भाविकांना जेवण देत असतात. कोरोना काळात लग्नाचा 42 व्या वाढदिवशी स्वतः स्वयंपाक करून 2000 व्यक्तींना सुग्रास जेवणाचे डबे ते कार्यकर्त्यांच्या मदतीने पोहोच केले आणि नवा पायंडा पडला.