कर्जत दि १३ :- कर्जत शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात कर्जत पोलिसांना यश आले असुन,१०लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चोरी बाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
१०मे रोजी बुवासाहेबनगर (ता.कर्जत) येथे एका घरात सकाळी १० वाजेच्या सुमारास विठ्ठल शाम दसपुते हे आपले राहते घर लॉक करून काही कामानिमित्त बाहेर गेले असता १२:३० नंतर घरी आल्यावर कोणीतरी अज्ञाताने घराचे कुलूप उघडुन घरातील सामानाची उचका पाचक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक घर तपासले असता घरात ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली नाही.याबाबत कर्जत पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने सुरु केला होता.पोलिसांनी तपास करत एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि जवान तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि जवान यांनी सलग २४ तास तपास करून गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चोरी बाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी गेलेल्या मालापैकी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १०लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली अनिल कटके,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे,भगवान शिरसाट, किरण साळुंखे,पोलीस जवान हिंगडे,सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, सुनिल खैरे,श्याम जाधव, महादेव कोहक, रवींद्र घुंगसे, प्रकाश वाघ, रोहित यामुळ, चंद्रकांत कुसाळकर, अमित बर्डे, सुनील वारे यांनी केली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, अमित बर्डे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे