पुणे दि १३ :- पुणे शहरातील येरवडा परिसरात जाहिरातीचा फलक लावण्यास न हरकत दाखला देण्यासाठी पुणे येरवडा वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
उपनिरीक्षक बसवराज धोंडोपा चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. धोंडोपा हे येरवडा वाहतूक विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहे.
याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांनी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी वाहतूक विभागात अर्ज केला होता. त्यास न हरकत दाखला देण्यासाठी धोंडोपा यांनी 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास सुनील क्षीरसागर, पोलिस निरीक्षक,हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व . अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३. व्हॉटस अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३