दौंड दि १२ :- देऊळगाव राजे येथील प्राथमिक केंद्रात १२ मे रोजी लसीकरण चालू असताना परिसरातील सर्व नागरिक दुसऱ्या लसीकरण साठी आले होते.ग्रामीण नागरिकांनी ज्यांनी पहिला लसीचा डोस घेतला त्यावर २८ दिवसांनीं घ्यावे अशी नोंद असल्याने बरेच नागरिक लसी करण करून घेण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून जमा झाले.नंबर नुसार यादी तयार झाली.कामकाज वेळेनुसार उशिराच सुरू झाले.जस जसे यादी प्रमाणे नाव घेत लसीकरण सुरू केलं तस त्यांचा मन मानी कारभार चालू केला व नंतर नागरिकांना सांगितले की,४५ दिवस पूर्ण झालेल्यांना च लस भेटेल.त्यांची भाषा ही अर्वाच भाषेत, उद्धट पने कर्मचाऱ्याने वापरल्या
” तुम्हाला दंम निघत नाही का ,एवढी काय घाई झाली , नंतर ये” अश्या स्वरूपाच्या भाषेत वयस्कर लोकांना ह्यांचे बोलणं.आणि विना नोंदणी लसीकरण ऐका बाजूने केलं जात आणि दुसऱ्या बाजूने ४५ च्या पुढील नागरिकांना उद्धत पने बोलल जात ह्यावर आश्या कर्मचाऱ्यांना कोण जाब विचारणार की नाही.हे सर्व झाल्यावर तोच कर्मचारी ११:२२मी सकाळी छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे नंतर नोटीस बोर्डावर सूचना लिहितात.हे यांची कामातील तत्परता का? असा प्रश्न नागिरिकान कडून विचारला जात आहे.वाड्या वस्ती रानातून नागरिक लसी साठी येतात आणि यांचं असा गलथान कारभारा मुळे व त्यांच्या उद्धट पणी बोलण्याला त्रस्त झालेत.याचा विचार प्रशासनानं करणं गरजेचं आहे . गावातील होतकरू ,सामाजिक कार्यकर्ते गोंधळ होऊ नये,कर्मचारी वर्गावरील ताण कमी व्हावा म्हणून स्वतः पुढाकार घेऊन आलेल्या नागरिकांची स्वतः ज्यावेळेस येईल तशी नाव नोंदणी करतात यादी करून देतात सहकार्य केलं जातं.तरी सामाजिक आंतर चां फज्जा उडवला जातो. नात्याने सरपंच वेळोवेळी तत्परता आपापल्या कामात दाखवतात उपाययोजना केली जाते.covid 19 विषयी अनेक उपाययोजना राबवलेली जातात तसेच राष्ट्रीय मानव आधिकार भ्रष्टचार संघटनेकडून पण दे.राजे प्राथमिक केंद्रास मागील काही दिवसात कर्मचारी वर्ग वेळेवर उपस्थित राहत नसल्याबाबत निवेदन देऊनही दोन दिवसात आहवाल मागूनही सहकार्य नाही जर एव्हढ सहकार्य करून नागरिकास चांगली वर्तणूक देत नसतील तर भविष्यात नागरिकां च्या रोषाला सामोरे जावे लागेल.याची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे.
दौड प्रतिनिधी :- महेश देशमाने