पुणे दि ०६ :- पुणे शहरातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक दिवसीय इन्स्टाग्राम उपक्रमाद्वारे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
दिनांक ०४/०५/२०२१ रोजी १६.०० वा ते दिनांक ०५/०५/२०२१ रोजी १६.०० वा पर्यंत नागिरकांना थेट प्रश्न विचारण्याचे आवाहन करीत उत्तरे दिली आहेत. त्यांनी नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थाबाबत विश्वास निर्माण करीत विविध प्रश्नांना उत्तरे दिली.सोशल मीडियाद्वारे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी इन्स्टाग्रामद्वारे एक दिवशीय उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याद्वारे नागरिकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पुणे शहरातील विविध भागातील 9 हजार 786 नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.त्यापैकी 250 पेक्षा जास्त नागरिकांनी आयुक्त गुप्ता यांना प्रश्न विचारले. त्यानुसार 25 ते 30 प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी नागरिकांची वाहवा मिळविली. इन्स्टाग्राम उपक्रमास 7 हजार 850 पेक्षा अधिक नागरिकांनी लाईक्स केले. नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये सायबर फसवणूक, वाढती गुन्हेगारी अशा प्रश्नांचा समावेश होता. अवैध धंदे, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः नागरिकांना लुटमार करणाऱ्या टोळ्याचा नायनाट करण्यासाठी त्यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 29 टोळ्यांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करून त्यांनी पुणेकरांची मने जिंकेली आहेत. सराईत गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्यासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे. दुर्बल, महिला, लहान मुले, वयोवृध्द यांच्या समस्या सोडविणे. त्यांना बळ देऊन पुणे शहर पोलीस खात्यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांचे मनात विश्वास निर्माण केला आहे.व पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी अश्या प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी विनंती केली . तसेच पुणे शहर पोलीस करत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन कामाचे कौतुक केले .