पुणे दि ०६ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संचारबंदी लागू असल्याने पोलिसांकडून पुणे शहरात नाकाबंदी ठिकाणावर कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच औंध येथील राजीव गांधी पुलाजवळच्या नाकेबंदी ठिकाणावर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी सुरु आहे तसेच बाणेर वरुन व ईतर ठिकाणी पुण्यात येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी सुरु केली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या औंध येथील राजीव गांधी पुलावरही चतुर्श्रुंगी पोलिसांकडून पिंपरी-चिंचवडकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. तसेच आमच्या प्रतिनिधी यांना चतुर्श्रुंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे म्हणाले, ”संचारबंदी असतानाही नागरिक वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पडत आहे.व पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी स्वत: काही नाकेबंदी ठिकाणी पाहणी करून कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार औंध व अन्य ठिकाणी नाकेबंदी कडक तपासणी केली जात आहे, परंतु वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडले जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.”