कर्जत दि ०६ :- कर्जत तालुक्यातील कापरेवाडी पाटील मळा येथील शिवारातील संभाजी विजयकुमार पाटील यांच्या राहत्या घरासमोरील सुमारे १० वर्षापूर्वीचे ८ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड दि.९मार्च २० रोजी रात्री२ते पहाटे६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इराद्याने चोरून नेले होते.अशी फिर्याद कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं १६०/२०२१ भा.द.वि कलम३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
तपासा दरम्यान कर्जत पोलीसांना गुप्त बतमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आलेश उर्फ अक्षय देविदास भोसले रा.राजीव गांधी नगर कर्जत ता.कर्जत याने केला आहे. अशी बातमी मिळाल्यानंतर दि.३० एप्रिल २१ रोजी रात्री ९:१७ वाजण्याच्या सुमारास आलेश उर्फ अक्षय देविदास भोसले यास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार सलीम शेख,पो.कॉ श्याम जाधव,पो.कॉ उद्धव दिंडे यांनी कर्जत येथून मोठ्या शिताफीने २ किलोमीटर पाठलाग करून पकडण्यात आले असुन, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.त्यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवालदार सलीम शेख,पोलीस कॉन्स्टेबल श्याम जाधव,उद्धव दिंडे यांनी केली आहे व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे