कर्जत दि २७: – कर्जत येथील पंक्चर दुकान फोडून टायर चोरी करणारी टोळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.महेश दिपक माने,जगदंबा मंदिरामागे राशीन,विशाल गंगा जाधव,जुना बैल बाजार राशीन,अभिषेक उर्फ बबलू विजय घोडके, वसंत गल्ली राशीन,अविनाश गणपत भाले,गारुड गल्ली राशीन,राहुल संतोष उफाडे,सरकारी दवाखाण्याजवळ राशीन,ता. कर्जत
आदिंसह अल्पवयीन सहा जणांना पकडण्यात आले. या आठवड्यात चांगल्या कारवाई करुन आरोपींना अटक केल्याने या कारवाईचे कौतुक कर्जत येथील नागरिकांमधून होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जोहिन सलीम सय्यद रा. कुंभार गल्ली कर्जत यांचे कर्जत राशीन रोडवर कर्जत येथे बहार नावाचे टायर पंचर दुकान आहे. दुकानात ट्रकचे जुने २५ टायर कंपनी रिप्लेसमेंट करिता जमा करून ठेवले होते. ते टायर पंक्चर चे दुकान बंद करून रात्री घरी गेले असता ठेवलेले टायर अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकान फोडून चोरून नेले आहेत,एक लाख रुपये किमतीचे २५ टायर चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाची चक्रे फिरवून कर्जत पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन सी. सी.टी.व्ही फुटेज व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सदर चे आरोपी राशिन येथील असल्याचे समजले.
त्यानुसार ६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती आणि जितो अशी २ चारचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली. चोरी केलेले २५ टायर हस्तगत केले असून, असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला असुन ६ आरोपींना अटक करून माननीय कर्जत न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी २ दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड दिले आहे.सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशनचे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,स.पो.नी सुरेश माने, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम , शाहूराज तिकटे, यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महादेव गाडे हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे