मुंबई दि २७ :- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे व आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला.आहे आता कोरोना संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रातील टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी कोरोना संदर्भात मोठं आणि सकारात्मक वक्तव्य केलं आहे. मे महिन्यात कोरोनाची लाट ही पूर्णपणे आटोक्यात येईल, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केलं आहे.महाराष्ट्रात सध्या कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.सोमवारी एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राने लसीकरणाचा नवा विक्रम नोंद केला आहे.1 मे पासून 18 वर्षांच्यावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. त्यासाठी लसीकरण केंद्र हे 12 तास सुरू राहिले पाहिजे. यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा तास ज्येष्ठ नागरिकांसाठी तर सहा तास 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी राखून ठेवावे असंही सांगण्यात आल्याचं टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी बोलताना स्पष्ट केलं.