पुणे दि २७ :-पुणे शहरात व्यवसायिकांना धमक्या देऊन खंडणी उकळणे व एक इसम , वय ६० वर्षे , रा . भांडारकर रोड पुणे यांना दिप्ती सरोज काळे , निलेश उमेश शेलार यांनी सन २०१८ ते दिनांक १५/१२/२०२० या कालावधीत त्यांनी त्यांचे ज्वेलर्स येथे गुंतवणुक केलेले पैसे परत मागण्यासाठी वेळोवेळी त्यांचे घरी तसेच दुकानावर येवून शिवीगाळ व धमकी देवून तसेच फोनब्दारे देखील वारंवार वाईट भाषेत शिवीगाळ करुन धमकी दिलेबाबत तसेच त्यांना फोन करुन त्यांचे कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची धमकी देवून असभ्य भाषेत बोलून त्यांचा अपमान करुन व शिवीगाळ करुन मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देवून सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्यात दीप्ती सरोज काळे व तिच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. या कारवाईने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. तर पुणे शहर आयुक्तांचा हा 28 वा मोक्का अंतर्गत कारवाई आहे.
दीप्ती सरोज काळे व निलेश उमेश शेलार (रा. कोथरुड) यांना अटक केली आहे. तर या टोळीतील इतर फरार आहेत.दीप्ती काळे टोळी प्रमुख असून, गेल्या दहा वर्षापासून या टोळीने कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याचे गुन्हे केले आहेत. गेली 10 वर्ष त्यांनी गुन्हे केले असून, आर्थिक फायदा घेतला आहे.नुकतीच दीप्ती काळे व इतरांवर सराफ व्यवसायिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि एका बांधकाम व्यवसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन जमीन जबरदस्तीने मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर विश्रामबाग पोलिसांनी पूर्वीचे रेकॉर्ड व आत्ताच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर टोळीवर मोक्काची कारवाई करावी, असा प्रस्ताव परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्याची छाननी करून तो प्रस्ताव कारवाई करण्यासाठी अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यानुसार या प्रस्तवावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काची कारवाई केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती सुषमा चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग पुणे शहर या करीत आहेत . सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर डॉ . संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ पुणे शहर श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ पुणे शहर सागर पाटील ,पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्रीनिवास घाडगे ,सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर मालोजीराव पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर विजय टिकोळे , तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रतिक्षा शेंडगे व पोलीस उप निरीक्षक राकेश सरडे विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे .