कर्जत दि.४:- कर्जत तालुक्यातील सिद्धेटेक येथील सबस्टेशन इंजिनियर संतोष मुरदंडे रा.दौंड यांनी तक्रार दाखल केली होती की काही दिवसापासुन सबस्टेशन वरील ऑईल कोणी तरी अज्ञात व्यक्ती चोरी करत आहे.त्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सिद्धटेक येथील विद्युत सब टेशन वरील डिझेल, ऑइल चोरण्याचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथक तयार केले होते. या पथकाने डिझेल चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलीस जवान मारुती काळे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, गणेश भागडे , संपत शिंदे यांनी सिद्धटेक परिसरातुन संशियत म्हणुन अमोल नामदेव जाधव वय 21 वर्ष,व पप्पु कुमार साहु वय 31 वर्षे दोघेही रा.सिध्दटेक या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली असता सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या धाकवताच गुन्ह्याची कबुली दिली.
याबाबत दोघांना 5 दिवस पोलीस रिमांड मिळाला असुन त्यांनी चोरलेले 13 हजार 200 रु. किमतीचे अपार कंपनीचे 110 लिटर ऑईल जप्त केले असून पुढील तपास पो.हे.कॉ.मारुती काळे हे करित आहेत. राशीन,सिद्धटेक परिसरात गेल्या काही दिवसांपासून डिझेल,ऑइल चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे.त्याबाबत सुद्धा अधिक तपास करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली
सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस जवान मारुती काळे, सागर म्हैंत्रे, भाऊसाहेब काळे,गणेश ठोंबरे , गणेश भागडे , संपत शिंदे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे