श्रीगोंदा दि.४:-श्रीगोंदा तहसिल कार्यालय परिसरातील काही एजंटांनी काही कर्मचाऱ्यांशी संधान साधून ‘दुकानदारी’ सुरू केल्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. विविध प्रकारची कामे करून देण्यासाठी दरही ठरले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.श्रीगोंदा तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष , संजय गांधी निराधार योजना , व पुरवठा विभाग या तीन विभागात मध्यस्थी एजंटनी उच्छाद मांडला असून त्यांचे कामे तत्काळ न केल्यास या विभागातील अधिकायांवर दबावतंत्र दमदाटी तसेच महिलांच्या नावे निवेदन देत अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राजरोस सुरू असून या एजंटांकडून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे .
काही कारणास्तव ज्या नागरिकांचे कामे तहसील कार्यालयात अडली आहे,अशा नागरिकांना गाठून काम करुन देण्याच्या नावाखाली सर्रास आर्थिक लुट केली जात आहे. साधारणत: नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी २ हजार रुपये प्रतिज्ञापत्र, दोनशे ते तिनशे रुपये शुल्क, उत्पन्नाचा दाखला २०० रुपये, अशा विविध कामाकरीता दर ठरविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तहसिल कार्यालय परिसरातून एजंटला हद्दपार करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतूून होत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे