पुणे दि २५ :- पुणे हडपसर परिसरात गाडीतळ पुलाखालून आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे ३ आरोपीने अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. विशेष म्हणजे, त्याला पहाटेच कोणी तरी तिथे आणून सोडले, असे सांगण्यात येत होते व या मुळे या परिसरात ‘ही पोलिसांची दहशत,’ की त्या ‘अपहरणकर्त्यांना त्यांची दया आली,’ अशी चर्चा सुरू झाली होती व या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती.व त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी शर्मिला नीलेश काळे या हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती.ती रविवारी रात्री येथे आली होती. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना तिन आरोपी पायी चालत त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेले.व काही वेळानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीनी संपूर्ण गाडीतळ परिसर पिंजून काढला; परंतु बाळ सापडले नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत बाळ हरवल्याची तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला होता. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. पोलीस शोध घेत असताना आज पहाटे अज्ञातांनी त्या चिमुकल्याला पुन्हा या ठिकाणी आणून सोडले आहे. दरम्यान, या चिमुकल्या मुलाला अपहरणकर्त्यांनीच या परिसरात पुन्हा आणून सोडले होते व हडपसर पोलीसांनी ६ तासाच्या आता आरोपींना अटक केले ” हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत दि .२३ रोजी पहाटे ०५/०० वाजताचे सुमारास कोणीतरी अज्ञात महिला यांनी मुलगा कार्तिक वय १ वर्षे यास पळवून नेलेबाबत मुलाची आई नामे शर्मिला निलेश काळे रा हडपसर पुणे . यांनी तक्रार दिल्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता . सदर गुन्हयातील अपहृत मुलगा नामे कार्तिक निलेश काळे वय १ वर्षे याचा मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनानुसार तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांनी लोणीकाळभोर , यवत , चौफुला.दौंड या परिसरात कसुन आरोपींच्या मागावर असताना आरोपीतांनी पोलीसांच्या कारवाईला घाबरुन दि .२५ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३/०० वाजताचे सुमारास अपहत मुलगा नामे कार्तिक यास हडपसर ओव्हरब्रीजखाली त्याला ज्या ठिकाणाहुन पळवुन नेले होते त्याच ठिकाणी सोडुन पसार झाले होते . आरोपींनी दाखवलेल्या आव्हानाला हडपसर पोलीस तपासपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीताचे आव्हान स्विकारुन आरोपी आलेल्या व परत गेलेल्या मार्गावरिल तांत्रिक बाबी तपासुन व इतर आवश्यक त्या बांबीचा कौशल्यपुर्ण व अविरतपणे अभ्यास केला असता तपासाअंती बाळाला पळवून नेणारे आरोपीताना सापळा लावुन चौफुला चौकाजवळ २ महिला व १ पुरुष यांना पकडुन त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १ ) पंचशीला तिपन्ना मेलीनकेरी वय ३३ वर्षे रा.जय तुळजाभवानी हॉटेलच्या पाठिमागे चौफला ता.दौंड जि.पुणे मुळगाव- मु.पो.शिरपुर ता.बसवकल्याण जि.बिदर राज्य कर्नाटक २ ) वैशाली तुळशीराम सोनकांबळे वय ४१ वर्षे रा.सदर ३ ) केरनाथ नागनाथ सुर्यवंशी रा.सदर असे सांगितले . तेव्हा त्यांना सदर गुन्हयाचे अनुशंगाने विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना सर्वांना दि २५ रोजी अटक करण्यात आलेली आहे . सदरची महिला नामे पंचशिला हिने सांगितले की , “ तिचे सुमारे १५ वर्षापुर्वी तुळशीदास मेलीनकेरी हयाचेशी विवाह झाला होता . परंतु लग्नाला १५ वर्ष होवुन सुध्दा मुलबाळ झाले नव्हते . त्यामुळे तिला एक वर्षापुर्वी नवऱ्याने सोडुन दिले होते . तिला स्वतःला एकटेपणाची जाणीव होत असल्याने व मातृत्वाची ओढ लागल्याने तिने बाळ दत्तक घेण्याचे किंवा अनाथ आश्रमातुन बाळ सांभाळण्यासाठी घेवुन एकटेपणा दुर करण्याचे ठरविले होते . परंतु सध्या कोरोना आजारामुळे तिला बाळ उपलब्ध झाले नसल्याने व त्यामध्ये दिरगाई निर्माण झाल्यामुळे तिने तिची मोठी बहिण वैशाली व भावजी केरनाथ यांचेसोबत चर्चा करुन बाळ पळवुन आणण्याचे ठरविले व दि २३ रोजी हडपसर ब्रीजच्या खाली रस्त्याचे फुटपाथवर झोपलेल्या बाळाला पळवुन आणले होते . परंतु हडपसर पोलीस स्टेशन कडील पोलीस हे आमचे मागावर असल्याची आम्हाला कुणकुण लागल्याने पोलीसांच्या कारवाईच्या भीतीने सदरचे बाळ हे पुन्हा जेथुन पळवुन आणले होते त्याच ठिकाणी दिनांक -२५ रोजी पहाटे ०३/०० वाजताचे सुमारास सोडुन दिले तर पोलीस आमचा शोध घेणार नाही या हेतुने आम्ही सदरचे बाळ हडपसर ब्रीजखाली सोडुन दिले आहे . ” असे त्यांनी पोलीसांना सांगितले . अशा पध्दतीने अंत्यत जटील व आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत , सदरची कामगिरी नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते . सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि ( गुन्हे ) राजु अडागळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , पोलीस हवालदार प्रताप गायकवाड , पोलीस नाईक विनोद शिवले , सैदोबा भोजराय , समीर पांडुळे संदिप राठोड , अविनाश गोसावी , नितीन मुंढे , पोलीस शिपाई अकबर शेख , शशिकांत नाळे , शाहीद शेख प्रशांत टोणपे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , उमाकांत स्वामी निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास हडपसर पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन थोरात हे करित आहेत .