पुणे दि २४:- पुण्यातील उद्योजक व ऑटोमोबाईल क्षेत्रातील गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे शहर पोलिसांनची उत्कृष्ट कामगिरी ला यश आले आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत.
गौतम पाषाणकर हे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते.त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती.व पोलिसांनी गौतम पाषाणकर हे राहते घराचे बाहेर पडुन ते कोठेतरी निघुन गेले बाबत शिवाजीनगर पो.स्टे . येथे दि २१ ऑक्टोंबर रोजी मिसींग दाखल करण्यात आली होती . पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या सुचना नुसार सदर मिसींग व्यक्तीचा गुन्हे शाखा युनिट -०१ मार्फत शोध चालु होता . युनिट -०१ गुन्हे शाखेकडील अधिका यांनी गुप्त सुत्रामार्फत नमुद मिसींग इसमाचा तपास केला . प्रथमदर्शनी नमुद व्यक्ती ही कोल्हापूर येथून बंगलोर , मदुराई , हैद्राबाद , कलकत्ता व जयपुर या ठिकाणी गेलेचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर समजुन आले . त्यानंतर गुप्त सुत्राबाबत दि २४ नोव्हेंबर रोजी नमुद व्यक्ती , चंद्रगुप्त हॉटेल , जयपुर येथे असल्याचे खात्रीलायक समजलेने गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले. त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी घरासमोरुन बाहेर पडल्यावर ते थेट स्वारगेटला आले होते. तेथून त्यांनी भाड्याची एक कार ठरविली व ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे.व पाषाणकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना पुणे येथे आणण्याची प्रक्रिया चालू केली आहे . सदर प्रकरणी पुढील तपास युनिट -०१ , गुन्हे शाखा करणार आहे . वरील प्रमाणे पोलीस आयुक्त , अमिताभ गुप्ता यांचे आदेशान्वये , अपर पोलीस आयुक्त ,अशोक मोराळे व पोलीस उपआयुक्त बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०१ चे पोनि.सुनिल ताकवले व पो.उपनि . संजय गायकवाड , पो.उपनि . सुनिल कुलकर्णी , पो.हवा . योगेश जगताप , पो.ना. अय्यास दड्डीकर , पो.नि. बामगुडे यांनी अल्प कालावधीमध्ये प्रसिध्द उदयोगपती गौतम पाषाणकर यांचा शोध लावलेला आहे .व पोलीस पथक गेले अनेक दिवस त्यांच्या शोधामध्ये गुंतून पडले होते. उद्या सायंकाळपर्यंत पोलीस त्यांना घेऊन पुण्यात येईल.आसे अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त.पुणे शहर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे