पुणे,दि.24 :- पुणे विभागातील 4 लाख 97 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 26 हजार 630 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 01 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 36 हजार 735 रुग्णांपैकी 3 लाख 18 हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 957 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 205 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.61 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 879 रुग्णांपैकी 47 हजार 122 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 569 रुग्णांपैकी 40 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 515 रुग्णांपैकी 44 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 932 रुग्णांपैकी 46 हजार 706 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 555आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 929 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 525 , सातारा जिल्ह्यात 147, सोलापूर जिल्ह्यात 200, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 880 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 588, सातारा जिल्हयामध्ये 49, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 68 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 35 हजार 318 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 26 हजार 630 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )