पुणे दि २४ :- पुणे परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई पुणे महानगरपालिका हद्दीमधील वडगाव बुद्रुक स.नं. ४५ मध्ये बीडीपी आरक्षण असून या क्षेत्रावर बांधकाम करणेस पुणे महानगरपालिकेमार्फत परवानगी देण्यात येत नाही . या भागात नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केलेली असून या बांधकामांना नोटिसा देऊन आज दि . २४ नोव्हेंबर रोजी कारवाई करणेत आली आहे. ही कारवाई पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र .२ च्या वतीने कटर मशीन , जेसीबी , बिगारी कर्मचारी , पोलिस कर्मचारी व स्थानिक पोलिस अधिकारी यांचे सहकार्याने पार पाडली . कारवाई दरम्यान २ बहुमजली इमारत , प्लींथ
लेव्हलमधील १ बांधकाम असे एकूण १६००० चौ . फुट आरसीसी पक्के बांधकाम पाडणेत आले आहे. सदर कारवाई बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचे नियंत्रणाखाली झोन क्र . २ चे कार्यकारी अभियंता नामदेव गंभिरे , उपअभियंता राहूल साळुखे , प्रताप धायगुडे , कैलास कराळे व सर्व कनिष्ठ अभियंता यांनी यशस्वीरित्या पार पाडली . कारवाईसाठी सनसिटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास घेवारे , सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे व इतर अधिकारी उपस्थित होता. बीडीपी आरक्षणात कोणतीही बांधकाम करुन नयेत तसेच निवासी भागातही पुणे महानगरपालिकेची परवानगी घेऊनच बांधकामे करावीत असे आवाहन पुणे महानगरपालिका प्रशासनाचे वतीने करणेत आले आहे . महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र .४ च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येऊन सुमारे ७३हजार५०० चौ . फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले . पुणे पेठ घोरपडी स.नं. ६० व ६१ सोपान बाग व स.नं. ५१ बीटी कवडे रोड व स.नं. २ आनंद टॉकिज परिसर तसेच मुंढवा स.नं. ८९ धायरकर वस्ती परिसर येथे दि . २० नोव्हेंबर रोजी कारवाई केली . सदर कारवाई स.नं. ८ ९ ( प ) मुंढवा धायरकर वस्ती लेन येथील श्री . खंदारे यांचे ४२५० चौ . २ ( पै ) घोरपडी रेल्वे क्रॉसिंग जवळील श्री . रतन सनिष पाटील व इतर यांचे ७०० चौ . फुट , स.नं. ६० ( पै ) घोरपडी सोपानबाग येथील श्री . महेश भद्रावती यांचे १२०० चौ.फुट , स.नं. ६१ ( पै . घोरपडी सोपानबाग येथील आक्युपायर अलिम आदम मजेरी व इतर यांचे १२०० चौ . फुट असे एकूण ७३५० चौ . फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले .