पुणे दि २५ :- पुणे शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यास ७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई पुणे शहरातील वानवडी परिसरात झाली आहे.आनंदा काजळे असे पकडण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काजळे हे वानवडी विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहेत. यादरम्यान लॉकडाऊन काळातला हप्ता न दिल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना हप्ता देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. यावेळी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली.त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज वानवडी भागातील एका देशी दारूच्या दुकान दाराला ४ महिन्याचे २० हजार रुपयांची मागणी करून तडजोड ७ हजार रुपयांची लाच घेताना काजळे यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्या दोघांवर वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक .सुरज गुरव , ला.प्र.वि.पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकावर 1064, 02-26122134,सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .