पुणे दि २९ :- पुणे भिगवण येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व भिगवण पोलिस स्टेशन यांनी काही दिवसापूर्वी कारवाई करून तीन सराईतांकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली होती. हि गावठी पिस्तूल त्यांनी विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आले होते त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढील तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना विशेष पथक तयार करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व इतर स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अधिक चौकशी करून पुढील तपासामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून अजून पाच गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख भिगवण पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार विश्वास खरात, किरण पांढरे, विजय कांचन, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, अमोल शेडगे, धीरज जाधव, मंगेश भगत, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक व भिगवन पोलीस स्टेशन स्टाफ च्या संयुक्त पथकाने केली.