दुधनी दि २९ :- अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशालेचे दहावीचा निकाल १००%टक्के लागला आहे. मार्च २०२० एस.एस.सी परीक्षेमध्ये एकूण ५९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण
लक्ष्मी रत्नप्पा गोटे तृतीय 83.20%
झाले. यात विशेष प्रावीण्य मध्ये १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कु. गिता प्रभु झळकी ( गुण ८५.८०टक्के ) द्वितीय क्रमांक उत्तम सातलिंग निबांळ (गुण ८४ टक्के ), तृतीय क्रमांक
उत्तम सातलिंग निबांळ द्वितीय 84%
कु. लक्ष्मी रत्नप्पा गोटे (गुण ८३.२० टक्के) गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.श्री शंकर अण्णा म्हेत्रे व सचिव श्री. प्रथमेश म्हेत्रे व सहसचिव श्री . महादेव खेडसर मुख्याद्यापक व सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिले.
गिता प्रभु झळकीप्रथम 85.80%
अक्कलकोट प्रतिनिधी :- निंगप्पा श्रीमंत निंबाळ