पुणे २९ : -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ४७ वर्षांची यशस्वी परंपरा जपत रोझरी स्कुलचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे.पुणे परीसरात विमाननगर, वारजे आणि कॅम्प शाखेतून एकूण ७५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ५८२ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये, तर १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.रोझरी स्कुल विमानगरमधून श्रेयस भारती (९५.८%) प्रथम, ख़ुशी कालनकर (९४.४%) द्वितीय, तर रसिका फुटाणे (९४%) तृतीय आली आहे. रोझरी स्कुल वारजेमधून सुवीरा रुकडे (९७.८०%), पृथ्वीराज बनसोडे (९७.२०%), ईश्वरी जोशी (९६.४०%) गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आली आहे. तर झीनल पोटफोडे ९७.४% गुण मिळवून रोझरी स्कुल कॅम्पमधून पहिली आहे आहे. पृथ्वीराज बनसोडे (रोझरी, वारजे) याला संस्कृत विषयात, मुस्कान शेख (रोझरी, विमाननगर) हिला गणित विषयात १०० पैकी १०० तर देवर्षी गायकवाड (रोझरी, विमाननगर) हिला विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत.रोझरी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विनय अऱ्हाना यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अऱ्हाना म्हणाले, “दहावीच्या परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल मला विद्यार्थी आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य यामुळे कठीण वाटणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील या विद्यार्थ्यांचे यश म्हणजे भविष्यातील चमकते तारे आहेत. ‘रोझरी’ची यशाची ही परंपरा नव्या वर्षातही याच जोमाने सुरु राहील. विद्यार्थी व पालक यापुढेही आमच्यावर आधीप्रमाणेच विश्वास टाकतील. सत्यस्थितीत बदलेली शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा वाढत वापर आणि स्मार्ट एज्युकेशन यावर आम्ही काम करतो आहोत.”