पुणे दि.30- सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून तसेच इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता एकता दौड कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत विधानभवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेणे 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता उपस्थिती, एकता दौड प्रारंभ स्थळ – विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे, एकता दौड प्रारंभ सकाळी 8.05 वाजता, एकता दौड मार्ग- विधानभवन-फर्स्ट चर्च रोड- साधु वासवानी चौक-अलंकार टॉकीज-जनरल वैदय मार्ग-विधानभवन परिसर असा आहे.