पुणे दि.30- स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन भोर, पुणे व शिरुर दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार असून या कालावधीत सबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कटारे यांच्या अध्यक्षतेखाली स्वास्थ भारत यात्रेच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.पी.शिंदे, ए.जी.भुजबळ, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक ए.एन.लांभाते, पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (प्राथमिक) क्रिडा विभाग प्रमुख राजेंद्र दुमगे, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्र.शा.काकडे, मो.ह.इंगळे आदि उपस्थित होते.
स्वास्थ भारत यात्रे ही केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या सहयोगाने भारतीय अन्न व मानके प्राधिकरण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलाय व इतर विभागर राबवत असतात. या स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन (भोर, पुणे व शिरुर) दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या कालावधीत जनजागृतीच्या दृष्टीने स्वास्था मेळावे, प्रभातफेरी, आरोग्यविषयक व्याख्याने, यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा,साधनसामुग्री,उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबत योग्य ती खबरदारी सर्व संबधित विभागाने घ्यावी, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिल्या.
यावेळी सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.