नीरा नरसिंगपूर दि,२६ :- जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक दिलीप रावजी ढोले साहेब श्रीमंत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाने लाखेवाडी गावचा शहरी भागाचे रूपांतर झाल्याप्रमाणे वाटत असल्याने या भागातील नागरिक व जनता अतिशय आनंदित आहे विद्यानिकेतन यांच्या सहभागातून भारतीय नकाशा रेखाटण्यात आला नकाशा मध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा साखरेत जनतेची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत जय हिंद हे राष्ट्राचे शब्द साकार करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकमत व एकात्मता राखण्याचा संदेश दिला या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये लाखेवाडी परिसरातील पालक ग्रामस्थ विद्यार्थी-विद्यार्थिनी असंख्य बहुसंख्येने उपस्थित होते
नीरा नरसिंगपूर :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार