पिंपरी दि २१ : – काळेवाडी परिसरात राहत्या घरी चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास काळेवाडी येथे घडला.या प्रकरणी पीडित २२ वर्षीय पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तर २७ वर्षीय पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला घरी झोपल्या होत्या. त्यावेळी पतीने त्यांना झोपेतून उठवले. ‘तुझे बाहेर काय चालले आहे, तेरा किसके साथ संबंध हे, मुझे सब मालूम हे, तू सच बता’ असे म्हणून तुला आज खल्लास करतो अशी धमकी दिली. दगड घेऊन डोक्यात मारला, तसेच अनेक ठिकाणी दगड मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व पुढील तपास सपोनि टि एस भोगम करीत आहे