मुंबई दि २० : -भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा, महाराष्ट्रतर्फे हार्दिक अभिनंदन केले.मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाने निवडणुकातील यश आणि विकासाची कामगिरी या बाबतीत ऐतिहासिक झेप घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री व मावळते राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचा अभूतपूर्व विस्तार झाला आणि संघटन मजबूत झाले. मा. नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा संघटनात्मक विस्तार असाच पुढे चालू राहील आणि पंचायत ते पार्लमेंट सर्व स्तरावर पक्ष संघटना अधिक बळकट होईल, याची मला खात्री आहे.त्यांनी सांगितले की, मा. नड्डा हे भाजपा संघटना आणि राष्ट्रीय विचारांना समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांनी विद्यार्थीदशेपासून चळवळींमध्ये सक्रीय भाग घेतला आहे. पक्ष संघटना, सरकार आणि संसदीय कामकाज या सर्वांचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा भाजपा पक्ष संघटनेला लाभ होईल. आपण त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.