टेंभुर्णी दि २८ : – [प्रतिनिधी ]- माढा तालुक्यातील अकोले खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आ.बबनराव शिंदे व आ.संजयमामा शिंदे समर्थक गटाच्या व कारखान्याचे संचालक बबनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या शकुंतला बळीराम माळी यांची रिक्त जागेवर बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली
अकोले खुर्द ग्रामपंचायतवर विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बबनराव पाटील यांचे वर्चस्व असून माजी सरपंच महादेव घाडगे यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्याने रिक्त जागेची निवडणूक जाहीर झाली होती.शुक्रवारी या रिक्त जागेवर निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कु.शबाना कोरबू यांनी ग्रा.पं.सदस्यांची बैठक बोलाविली होती.या सभेस माजी सरपंच तथा ग्रा.पं. सदस्य महादेव घाडगे,उपसरपंच विलास पाटील,भारत नवले,अमोल चिंतामण,शकुंतला माळी,राहीबाई महाडिक हे सदस्य उपस्थित होते.
सरपंचपदासाठी शकुंतला बळीराम माळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोरबू यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी ग्रामसेवक संजय साळुंके,तलाठी प्रशांत जाधव,पोलिस पाटील नागेश पाटील यांनी मदत केली.
निवड होताच नूतन सरपंच शकुंतला माळी यांचा कारखान्याचे संचालक बबनराव पाटील यांनी सन्मान केला.निवडीबद्दल आ.बबनराव शिंदे,आ.संजयमामा शिंदे,जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक पाटील,मावळते सरपंच महादेव घाडगे,प्रधानमंत्री मुद्रा कमिटी संचालक राजकुमार पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेशपाटील,कृउबा.माजी संचालक संतोष पाटील,जेष्ठ नेते नानासाहेब नवले,विकास सोसा.चेअरमन हरिदास पाटील,कांतीलाल नवले,नागनाथ नवले,सुधाकर नवले,किसन घाडगे,संभाजी घाडगे,पंडित पाटील,सचिन पाटील,रामभाऊ घाडगे,प्रकाश घाडगे,गजानन तोडकर,संभाजी पाटील,दत्तात्रय महाडिक,गणेश भांगे,अनिल तोडकर,बाबुराव घाडगे,युवराज घाडगे,दशरथ पाटीलअनिल पाटील,विष्णू घाडगे,लक्ष्मण बनसोडे,सिद्धेश्वर जगताप,शरपुद्दीन पठाण,गणेश कुटे,तुकाराम बनसोडे,गणेश गिराम,अशोक घाडगे,रमेश घाडगे,नामदेव घाडगे,बिभिषण चिंतामण, दत्तात्रय भांगे,अनिल महाडिक,बापू देवकर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.गुलालाची उधळण करीत निवडीचा आनंद साजरा करण्यात आला.
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी