नीरा नरसिंहपूर : दि.,२० :- लुमेवाडी(ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.19) रात्री दर्शन घेतले.दरम्यान, जोधपुरी बाबांचा उरूस भाविकांच्या प्रचंड गर्दीत व उत्साहात संपन्न झाला.
जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे.जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपले सर्वांच्या पाठीशी आहेत.या दर्गाहसाठी आगामी काळातही लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल,असे यावेळी आयोजित कव्वांलीचा कार्यक्रम प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील व इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्या सत्कार करण्यात आला.
बाबांच्या ऊरूसाचे हे 25 वे वर्ष आहे. उरूसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवारी (दि.19) दुपारपासून भाविकांना सुमारे 40 क्विंटल दाळभाताच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याठिकाणी भेट देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे यांनी युवकांचे कौतुक केले.
दर्गाहला उरूसानिमित्त अतिशय आकर्षक पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती.मंगळवारी कव्वांलीचा जंगी मुकाबला पाहणेसाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती.या उरूसाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील,अकलूजचे सरपंच शिवबाबा मोहिते पाटील उदयसिंह पाटील मनोज जगदाळे यांनी ही भेट देऊन बाबांच्या दर्गाहचे दर्शन घेतले.
उरुसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या निमित्त 51 लोकांचे रक्तदान झाले
सरपंच उपसरपंच व दर्गा कमिटी व लुमेवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने उरूस साजरा करण्यात आला
माझी सरपंच उस्मान शेख मा . सरपंच कमाल जमादार
विद्यमान सरपंच पोपट जगताप सुनील जगताप आमीन शेख नूर मोहम्मद शेख ग्रामसेवक गणेश लंबाते या सर्वांच्या मार्गदर्शन उरुस सण साजरा करण्यात आला
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी