पुणे,दि.२० :- पुणे शनिवार पेठेत रहाणाने ५८ वर्षीय नागरिक से:वानिवृत्त आहेत. ते त्यांचा २१ वर्षीय मुलगा आणी कुटूंबासह एकत्र रहातात. मुलाने महाविद्यायाचे शुल्क भरायचे असल्याचे सांगत वडिलांच्या बॅंक खात्यातून मुलाने ऑन लाइन पध्दतीने स्वत:च्या खात्यात दहा लाख आठ हजार रुपये ट्रांन्सफर करुन घेतले. हे पैसे ट्रांन्सफर करुन घेतल्यावर मुलगा मौज-मजेसाठी बाहेरगावी निघुन गेला. त्यांच्या वडिलांना ही घटना कळताच मोठा मानसिक धक्का बसला. सेवानिवृत्तीची रक्कम मुलाने अशा प्रकारे फसवून स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली होती. वडिलांनी विश्रांमबाग पोलिसांकडे धाव घेत मदतीची मागणी केली. पोलिसांनीही तातडीने मुलाचा बोलावून घेऊन समुपदेशन करत वडिलांची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवार पेठेत रहाणाने ५८ वर्षीय नागरिक सेवानिवृत्त आहेत. ते त्यांचा २१ वर्षीय मुलगा आणी कुटूंबासह एकत्र रहातात. मुलाने महाविद्यालयाचे शुल्क भरायचे असल्याचे सांगत वडिलांचे डेबिट कार्ड घेतले.त्याव्दारे वडिल राजेंद्र कल्याणी यांच्या बॅंक खात्यातून १० लाख ८ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतले. पैसे वर्ग करुन घेतल्यानंतर तो तातडीने बाहेरगावी निघुन गेला. दरम्यान राजेंद्र कल्याणी यांनी मुलगा ललित कल्याणी याने आपल्या बॅंक खात्यातून मुलाने स्वत:च्या बॅंक खात्यात परस्पर वर्ग केलेली रक्कम मिळवून देण्याची विनंती शनिवार पेठे पोलिस चौकीत केली. त्यांनी यासंदर्भात एक अर्जही केला होता. त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा आणी पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांनी तातडीने कार्यवाही सुरु केली. पोलिसांनी संबंधीत बॅंकेला पत्र लिहून संबंधीत खात्यातील व्यवहाराचे पेमेंट थांबविण्याची विनंती केली. यासंदर्भात मुलाचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुलगा काही दिवसांनी परत आल्यावर पोलिसांनी त्याला समजावून समुपदेशन केले. यानंतर मुलाने माफी मागून पुन्हा असे गैरकृत्य करणार नसल्याची कबुली दिली. यानंतर बॅंकेशी संपर्क साधून मुलाच्या खात्यातून वडिलांच्या खात्यात संबंधीत रक्कम वळती करण्यात आली. यामुळे सेवानिवृत्त नागरिकाने पोलिसांचे आभार मानले आहेत.