पुणे, दि. १२:- पुणे ग्रामीण परिसरात देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणार्या इसमाला “स्थानिक गुन्हे शाखेकडून जुन्नर येथून पोलिसांनी अटक केली आहे.मा.पोलीस अधीक्षक.संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील अवैद्य अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांबाबत बातमी काढून जास्तीत जास्त अवैद्य अग्नीशस्त्रे जप्त करण्याकरीता विशेष मोहीम राबविणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना आदेश दिलेले होते.
मा. पोलीस अधीक्षक. संदीप पाटील यांनी दिलेल्या
आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यारीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रविंद्र मांजरे, पो.हवा.शंकर जम, सुनिल जावळे, शरद बांबळे, पो.ना.दिपक साबळे यांचे पथक तयार करून त्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना जुन्नर शहरात जुना एस. टी. स्टँड येथे इसम घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली. त्या ठिकाणाची माहिती बातमीदाराच्या वर्णनाचा इसम उभा दिसला. गुरव यांनी टिमना इशारा केल्यावर टिमनी त्याच्यावर झडप टाकून पाहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. त्याला नाव, पत्ता विचारल्यावर त्याने आदिनाथ दिलीप जाधव वय 21 वर्षें राहणार – जामगाव ता.गंगापूर जि.औरंगाबाद हा एक मोटारसायकल सह. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केला आहे. त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने ‘ जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे .स्थानिक गुन्हे शाखेकडून नियुक्त केलेल्या पथकामार्फत यापुढेदेखील अशाच प्रकारच्या कारवाई सुरू राहणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीबाबत मा. पोलीस अधीक्षक सो., पुणेग्रामीण यांनी समाधान व्यक्त करून रोख बक्षीस जाहीर केले आहे.