पुणे दि ,१२ :- पुणे कोकणे चौक रहाटणी येथे राज्य उत्पादन शुल्काच्या ईविभागाने सापळा रचून विदेशी दारू जप्त केली आहे.ही दारू गोव्यातून महाराष्ट्रात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आली असल्याचे समजते.नागेश मारुती सावंत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वाकड ते नाशिक फाटा या मार्गावरून एक टेम्पो गोवा वरून विदेशी मद्य घेऊन येणार असल्याची माहिती पिंपरी विभागाला मिळाली.होती त्यानुसार, रहाटणी येथील कोकणे चौकात मंगळवारी पहाटे सापळा रचून एका संशयित टेम्पोला थांबवून चौकशी केली असता टेम्पोमध्ये विदेशी मद्याचे 11 लाख 94 हजार 600 रुपये किमतीचे 139 बॉक्स आढळून आले.व दारू महाराष्ट्र राज्यात मोठ्या किमतीत विकली जाते. गोवा राज्यातून स्वस्त दरात खरेदी करून महाराष्ट्रात जास्त किमतीला विकून पैसे कमावण्यासाठी ही दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मद्यामुळे शासनाचा महसूल चुकवला जातो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दारू आणल्याचे समोर आले आहे.