वडगाव मावळ दि,०५ :- सरकार कोणत्याही पक्षाच्या येवो जास्तीत जास्त निधी आणून मावळच्या जनतेच्या सहकार्याने मावळच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही मावळचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.वडगाव नगरपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सुनील आण्णा शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.त्यावेळी सत्काराच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होतेयावेळी आयोजित सत्कार सभारंभाला माजी राज्यमंत्री मदन बाफना जि.प.सदस्य बाबुराव वायकर माजी उपसभापती गणेशआप्पा ढोरे, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,भास्करराव म्हाळसकर, माजी उपसंरपच तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे नगरसेवक सुनील ढोरे ,बाळासाहेब ढोरे,सुभाषराव जाधव,नगराध्यक्ष मयुर ढोरे उपनगराध्यक्ष राहुल ढोरे वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उटघाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.शेळके यांना वडगावातुन ३००० हजाराचे मताधिक्या दिल्याने वडगाव नागरीकांचे शेळके यांनी आभार मानले.मावळातील जनतेसाठी आरोग्याच्या दुष्टीने तालुक्यात जिल्हा रूग्णालय उभारण्याचा मनोद्यही शेळके यांना व्यक्त केला.राजकारण बाजुला ठेऊन विकासासाठी एकत्र यावे हि काळाजी गरज आहे.अनेक सामाजिक संस्थानी विकासासाठी एक पाऊल पुढे या मी दोन पाऊले पुढे येतो असा आमदार सुनील शेळके यांनी शब्द दिला.नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी नगरपंचायतीच्या इमारतीसाठी शहरातील पाणीपुरवठा अनेक विकासाच्या कामात निधी उपल्बध करुन देण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांनी स्वागत केले नगरसेवक चंद्रजित वाघमारे व माया चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले गटनेते राजेंद्र कुडे,नगरसेवक प्रमिला बाफना पुजा वहिले पुनम जाधव, दिनेश ढोरे प्रविण चव्हाण, सुनीता भिलारे,आदीनी संयोजन केले.
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी