मावळ दि०३ : -मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतक-यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे व सचिव रामदास पडवळ यांचे सह्या असलेले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नसल्याने या शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन पिकविलेले सोन्यासारखी शेती कापायला झाली असली तरी कापता येत नाही आणि धाडस करून कापलेली शेती भिजल्याने ही भातशेती कुजून त्याला अक्षरशः मोड आल्याचे विदारक चित्र आपल्याला या शेतकऱ्याच्या शेतात पाहायला मिळत आहे.मावळात बहुताःश शेतकरी भात पिकांवर अंवलबुन असून व त्याचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो हा दुग्ध व्यवसाय सुध्दा भात पिकांपासुन मिळणाऱ्या चाऱ्या वर अवलबुन आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीची पाहणी करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी