निरा नरसिंहपुर दि, ०३ :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार टणु तालुका इंदापूर येथील भीमा नदीचा बंधाऱ्याचा भाग भीमा नदीला आलेल्या पाण्याने खचलेला आहे यासाठी राज्य शासनाने तातडीने निधी देऊन कामे मार्गी लावावी अशी मागणी नागरीकातून होत आहे हा मार्ग दळणवळणासाठी दुरुस्त करावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत टाकळी ते टणु या गावांना जोडणारा बंधारा असून अनेक गावांचा संपर्क या बंधाऱ्यात असल्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करून मार्ग मोकळा करावा शेतकऱ्याच्या जीवनाचा प्रश्न याच बंधाऱ्यावर अवलंबून आहे फुटलेला बंधारा दुरुस्त करून पाणी अडवणे व बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती झाली तर इथून पुढे येणाऱ्या पाण्याने व पावसाने बंधाऱ्याचा भाग खचणार नाही अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे बंधाऱ्याचे पाणी आडवणे म्हणजे शेतकऱ्याचा जीवनाचा प्रश्न आहे जमिनीची तहान भागवली तरच शेतामध्ये पिकाचे उत्पन्न होऊन शेतकऱ्याच्या पोटाचा प्रश्न मिटला जातो असेही नागरिक बोलत होते नरसिंह पूर परिसरातील पिंपरी टणु गिरवी टाकळी आलेगाव गणेशवाडी गिरवी या भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी या जा करण्याचा मार्ग बंद झालेला आहे अकलूज ही बाजारपेठ असल्यामुळे माढा तालुक्यातून अनेक बाजार करी स्वतःच्या पोटाचा उदरनिर्वाहासाठी बाजार आणण्यासाठी जात असतात हे दळण वळन बंद झाल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी जनतेची मागणी आहे हजारो लोकांचे जीवन या बंधाऱ्यावर अवलंबून असल्यामुळे तातडीने बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी अडवण्यास मदत होईल