निरा नरसिंहपुर दिनांक ३० प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर तालुका.इंदापूर तालुका नरशिंहपुर परिसरातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल व शेती मधील पिकांची नासाडी नीरा नरसिंगपूर परिसरातील शेती पिकांमधील केळी असो डाळिंब कलिंगड दोडका कोबी वांगी मक्याचे पीक उसाचे पीक आंबा कारले कांदा खरबूज या पिकांचे परतिच्या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुस्कान झालेले आहे स्वतःच्या पोटासाठी पिकवलेले पिक आलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था वाईट झाल्यामुळे शेतकरी राजाला कशी शेती पिकवावी कसे उत्पन्न काढावे असा प्रश्न शेतकरी राज्यापुडे निर्माण झालेला आहे पिंपरी परिसरातील एका शेतकऱ्याने ईकबाल लाला शेख यांचे दोन एकर कलिंगड अंतर्गत पीक केळीमध्ये लावले असता त्या कोलिगड्याची पूर्णपणे नासाडी झाली शेतकरी राजा नाराजी व्यक्त करीत आहे शेतकरी राजाची एकच मागणी आहे की पिकवलेला माल आणि झालेली नुस्कान याचे शासनाने पंचनामे करून शासन रुपी मिळेल त्यात समाधान शेतकरी राहील अशी मागणी शेतकरी करीत आहे