पुणे, दि २८:- पुणे शहरात दि,२१ रोजी विधानसभा निवडणुक असलेने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री अनिल शेवाळे, हे पोलीस स्टेशनचे हद्यीत पीटर मोबाईल मधुन पेट्रोलींग करीत असताना सांय. ०५.३० वा. चे
सुमारास कंन्ट्रोल रुम पुणे शहर येथुन गणेशखिंड रोड, कस्तुरबा वसाहत, जुनवणेनगर, औंध पुणे येथे भांडणे चालु
असले बाबत कॉल प्राप्त झाला असता व,पो,नि, श्री अनिल शेवाळे, त्यांचे बरोबर असलेला पिटर मोबाईल मधील पोहवा.
२३६७ शिंदे, पो,ना, ७५८३ पाखरे, पो,शि. १०५४९ बर्गे, पो,शि. ७५२६ खाडे,असे तसेच दिवस पाळी मार्शलवरील पो,शि.
७७२१ फसाळे, पो,शि. ९९३९ भोसले व रात्रपाळी मार्शल वरील पोना. ७३१५ गेंगजे, पो,ना. ७५८९ शिंदे सदर ठिकाणी
तात्काळ पोहचले असता तेथे यापुर्वी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.न.५४९/२०१८ भादवि कलम- ३०२,१२०(ब),
१४३,१४४,१४७,१४८,१४९ आर्म अॅक्ट क. ४ सह २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ मधील अटक
आरोपी नामे ओंकार दिलीप कदम वय ३७ वर्षे रा.४९/१,अक्षय अपार्टमेंट,गुलमोहर सोसायटी,लॉकॉलेज रोड,एरंडवणा
पुणे हा त्याचा साथिदार नामे निलेशकांता सावंत रा. कोथरुड पुणे याचे सह हजर होता व ते तेथे राहणारे रमेश शंकर
जुनवणे वय ४५ वर्ष रा.गणेशखिंड रोड, कस्तुरबा वसाहत, जुनवणेनगर, औंध पुणे याचे बरोबर शिवीगाळ व हाताने
मारहाण करुन रमेश शंकर जुनवणे हे तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडुन ठेवुन त्यांना जीवे
मारण्याची धमकी देत होते. व तेथे ब-याच लोकांची गर्दी जमली होती ती गर्दी वपोनि शेवाळे व त्यांचे वरील स्टाफने
बाजुस करुन ओंकार दिलीप कदम वय ३७ वर्षे रा.४९/१,अक्षय अपार्टमेंट,गुलमोहर सोसायटी,लॉ कॉलेज रोड,एरंडवणा
पुणे.व त्याचा साथिदार नामे निलेशकांता सावंत रा. कोथरुड पुणे यांना बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना
चतुःशृंगी पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे विरुध्द गु.र.न. ८८५ /२०१९ भा.द.वि.क. ३४१,३२३,५०४,५०६(१),३४ प्रमाणे
गुन्हा दाखल करुन त्यांना लागलीच गुन्हयात अटक केली त्यामुळे सदर ठिकाणी आणखी वरील प्रमाणेच शरिरा
विरुध्दचा गंभीर दखपात्र गुन्हा होण्याची शक्यता होती. त्यास वपोनि. अनिल शेवाळे, व त्यांचा वरील स्टाफ यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन गुन्ह्यास प्रतिबंध केला आहे.