पुणे दि.२१ :माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.
पाषाण येथील एन सी एल मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले.भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान हा मिळालेला महत्वाचा अधिकार आहे.प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी युवकांचा सहभाग मोलाचा आहे, असे त्यांनी सांगितले.