पुणे, दि. 21 : विधान सभेसाठी प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण व तरुणीनी मोठया प्रमाणात मतदान करावे, यासाठी हरित मित्र परिवार, सामाजिक वनीकरणं आणि उद्यान विभागाच्या वतीने, मतदान करून आलेल्या नवंमतदारांचा औक्षण करून त्याना औषधी वनस्पती आणि चंदनाच्या बियानाचे वाटप करण्यात आले.कर्वे रस्त्यावरील कलमाडी हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उप संचालक दिलीप घोलपतर उद्यान विभागाच्या प्रिती सिन्हा यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. रोपांची वर्षभर काळजी घेणाऱ्या नवंमतदारांचा हरित मित्र तर्फे गौरवही केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. महेंद्र घागरे यांनी दिली.नवमतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी दीपक गायकवाड, सुरेश परांजपे, राजेन्द्र मोरे, बाळा ढमाले, प्रा. रवी पिल्ले, आदी मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले होते.