निरा नरसिंहपुर दि,०७:- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार ,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुक्यातले महत्वाचे नेते व मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक , अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, बाळासाहेब घोलप अशा अनेक मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी आज हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पार्टी यांना जाहीर पाठिंबा दिला.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूरमध्ये खूप मोठं खिंडार पडलं आहे.आणि अनेक येत्या दिवसात मोठे मोठे बुरूज ढासळणार आहेत आशी इंदापुर मध्ये चर्चा रंगली आहे .विधानसभेच्या वेळेस आमदार भरणे यांनी आप्पासाहेब जगदाळे यांना शब्द दिला होता कि यावेळेस मी उभा राहतो .पुढच्या वेळेस तुम्ही तयारी करा म्हणून आप्पासाहेबांनी इंदापूर विधानसभाची तयारी केल्यानंतर आमदार भरणे यांनी शब्द फिरवला .आणि राष्ट्रवादी पक्षांना शब्द फिरवायची जशी सवय आहे या पद्धतीने आप्पासाहेब जगदाळे आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना फसवलं आप्पासाहेब जगदाळे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता.तो आज माघारी घेतला आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला .यावेळेस व्यासपीठावर माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माताई भोसले ,विलास वाघमोडे, बाबासाहेब चवरे , आप्पासाहेब जगदाळे, इंदापुर भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, बाळासाहेब घोलप, अशोक घोगरे , आमोलराजे इंगळे, मनोज जगदाळे , आप्पासाहेब जगदाळे समर्थक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ, शिवसैना , युवक पदाधिकारी व्यासपीठावर अनेक मोठमोठे दिग्गज नेते उपस्थित होते. या सर्वांच्या साक्षीने आज १४ मागण्या आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील व भारतीय जनता पार्टी यांच्या समोर मांडल्या या मागण्या येत्या आडीचं वर्षामध्ये ५० टक्के पूर्ण करायच्या आणि पाच वर्षांमध्ये शंभर टक्के पूर्ण कराव्या लागतीलं आशा अनेक शेतकऱ्यांच्या मागणी असून त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ह्या जनतेच्या मागण्यासाठी मी जाहीर पाठिंबा देत आहे. आणि केवळ हर्षवर्धन पाटलाला विजय करायचं तर कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे मताने निवडून आणायचं आणि ह्या इंदापूर तालुक्यामध्ये कमळ काय ताकत आहे हे दाखवून द्यायचं असं त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.या.यावेळेसष्ट्रवादी मध्ये कसे राजकारण चालतं कसा धोका दिला जातो हे जनतेला त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टी जातीपातीचे कधीचं राजकारण करत नाही. इथून पुढेही करणार नाही .सबका साथ सबका विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करू असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं .