निरा नरसिंहपुर दि,०७ :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर तालुका 2019 च्या विधानसभेच्या निमित्त इंदापूर तालुक्याचे उमेदवार दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ सौ सारिका दत्तात्रेय भरणे यांची पिंपरी बुद्रुक व परिसरात प्रचाराचा प्रारंभ पिंपरी बुद्रुक मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दत्तामामा भरणे यांचे मार्गदर्शक कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेऊन शुभारंभ केला सौ सारिका दत्तात्रेय भरणे पुढे म्हणाल्या की तालुक्यातील सर्व जनता आपल्या घरातील आपले कुटुंबा प्रमाणे आहेत असे समजून मामांचे कार्य असते कैलास वासी महादेवराव बोडके दादा यांचा आशीर्वाद व जनतेचे पाठबळ आज अखेर मामांच्या कर्तुत्वाला चांगल्याप्रकारे लाभलेले आहे व इथून पुढेही असाच आशीर्वाद रहावा ही सर्व मतदार बंधु भगिनी यांना विनंती केली या प्रचाराचा शुभारंभा निमित्त पिंपरी गावचे माजी सरपंच व राष्ट्रवादी पुणे जिल्हा माजी उपाध्यक्ष श्रीकांत बोडके रमेश मगर नागेश गायकवाड शहाजी बोडके हनुमंत पडळकर सतीश बोडके महेश सुतार महेश शिरसागर मोहन ढवळे पप्पू रंधवे अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते