पुणे, दि.६ :- तक्रारदारानी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनमजूर धनाजी कांबळे (वय ५१, रा. इंदापूर)सापळा रचून याला रंगेहाथ पकडले.आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पोकलँड मशीन वनक्षेत्रात गेल्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपीनी १ लाखाची लाच मागितली होती जी तडजोडीअंती २० हजार ठरली. ६ सप्टेंबर २०१९ रोजी पडताळणी करून सापळा लावून आरोपीला पकडून २० हजार जप्त केले. भिगवण पोलिस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिंबधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकावर १०६८ संपर्क साधण्यास आवाहन पोलीसअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.