मुंबई,दि२३ :- घाटकोपर मध्ये एका दहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देण्याच्या बहाण्याने जवळीक साधून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला अखेर गुरुवार दिनांक २२ रोजी त्याला अटक करण्यात आले. सचिन अनंत शामा ( वय ३५) राहणार काजुटेकडी घाटकोपर असे नराधमांचे नाव असून त्याने अश्या प्रकारे आणखीही काही गुन्हे केली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर मधील पारसीवाडी विभागात १७ तारखेला मुलगी डान्स क्लासवरून परतत असताना एका दहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देण्याच्या बहाण्याने जवळीक साधून तिला जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या बाजूला असलेल्या निर्जनस्थळी तो घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली असता त्या मुलीने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी त्या नराधमांने तिथून पळ काढला
घाबरलेल्या अवस्थेत ती छोटी चिमुरडी कशीबशी घरी केली. परंतु तिने ही माहिती आपल्या घरच्यांना दिली नाही. दोन ते तीन दिवसांनी झालेल्या प्रकाराबद्दल मुलीने आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी त्वरित जवळील घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि झालेल्या प्रकाराबद्दल माहिती पोलिसांना सांगितली व तक्रार नोंदवली घाटकोपर पोलिसांनी कलम ३५४ (ब) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,८ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या गुन्ह्यात पोलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीवरून तिला ज्या विभागातून घेऊन जाण्यात आले. तिथले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन त्या व्यक्तिचे काही फुटेज मिळताच पोलिसानी विभागात जवळ पास दोनशे जनाची विचारपूस केली. अखेर एका इसमाने आपण या फुटेज मधील व्यक्तिला ओळखतो त्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी तात्काळ गुरुवारी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी