हदगाव दि०२ :-.परभणी येथून आणलेल्या धान्याच्या चूरीच्या खुराका पासून विष बाधा झाल्याने ८ गिर गायींचा मृत्यू झाला तर २ गाय मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना हदगाव तालुक्यातील सूर्यनगर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी घडली असून या घटनेत मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितल्या जात आहे.सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील सूर्यनगर येथे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार असून या साखर कारखान्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गुजरात राज्यातील सात ते आठ परिवार मागील जवळपास २० वर्षांपासून राहत आहेत.या परिवारांजवळ गिर गायी,वासरे,म्हैस असे छोटे मोठे सत्तर ते ऐंशीच्या आसपास जनावरे आहेत.दुधाचा व्यवसाय करून हे आपली उपजीविका भागवीत आहेत.परभणी येथून दाळ,तांदूळ,गहू,ज्वारी, हरभरा या धान्याचे दळलेली चुरी आणून दूध देणाऱ्या जनावाराना खुराक म्हणून देत असतात.दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता देवा मोहन गवळी यांनी दूध काढल्यानंतर गायींना खाण्यासाठी चुरीचा खूराक ठेवला.एक तसा नंतर चार गिर गायी जमिनीवर कोसळून त्यांच्या तोंडातून फेस निघू लागल्याने गायी मालकाने हदगाव. येथील पशवैद्यकीय दवाखान्यात येऊन ही माहिती देताच पशुधन विकास अधिकारी अजय मुस्तरे यांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेत विष बाधा झालेल्या गायींवर तातडीने उपचार सुरू केले.परंतु ८ गायींना वाचविण्यात त्यांना अपयश आले २ गायीवर उपचार करणे सुरू आहे.त्यांना पशुधन पर्यवेक्षक दिनेश हुकुम (हदगाव),पशुधन पर्यवेक्षक जे.व्ही. उईके (लोहा),परिचर बोडखे (तामसा), वघटनेची माहिती मिळताच हडसनी येथील पोलिस पाटील दिलीप सुर्यवंशी घटना स्थळी धाव घेतली