.माजलगाव (प्रतीनीधी) राज्य सरकारने शहरापासून ते थेट खेड्या गावातील वाडी, वस्ती, तांडा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे. सर्व स्तरातील ग्रामपंचायत ला वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष देण्यात आले होते .परंतु माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील
ग्रामपंचायत सतत वादग्रस्त ठरली असून आज रोजी असाच एक प्रकार या ग्रामपंचायत चा उजेडात आला आहे. एक जूलै ला ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी दिलेले वृक्ष लागवड न करता ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत ठेवली होती. पण सर्व झाडे जळून खाक झाले आहेत त्यामुळे येथील सरपंच ऋतूजा राजेंद्र आनंदगावकर व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभार ने तर कळसच गाठल्याचे दिसून आले आहे.
मंजरथ गावच्या सरपंच व सरपंच पिता यांच्या हुकुमशाही मुळे गावकऱ्यांना तर सतत वेठीस धरलेच आहे. हम करे सो कायदा या म्हणी प्रमाणे हे आव देखील आणत आहेत.
लाखो रुपयांची झाडे शासकीय पातळीवरून मंजरथ ग्रामपंचायत ला दिली पण या गावात वृक्ष लागवड केली का नाही. ग्रामपंचायत मध्ये जळून पडलेल्या झाडावरून दिसत आहे.चांगूल पणाचा आव आणून गाव सुधारण्याचे ढोंग करणार्या पुत्री व पित्याचा भोंगळ कारभार ग्रामपंचायत मध्ये जळालेल्या झाडांच्या माध्यमातून आणखी चव्हाटय़ावर आला आहे. जळून खाक झालेल्या वृक्षांची नुकसान भरपाई शासकीय अधिकारी मंजरथ ग्रामपंचायत कडून भरपाई भरून घेतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.