माजलगाव( प्रतिनिधी):-तालुक्यातील देवडी येथील एका शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणाला आणि गरिबाला कंटाळून विषारी द्रव प्राश्न केले.उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकऱ्यांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले.ही घटना आज मंगळवारी (दि.२३.)पहाटे सहा वाजता घडली.पोलिसांनी सागितले,नागेश भिकाजी नाईकवाडे (वय २५रा.देवडी,ता.वडवणी)असे मयताचे नाव आहे.नागेश हा आई -वडील पाच भाऊ व एका बहिणीसह देवडी येथे राहायचा घरची परिस्थिती गरिबीची आहे.शेतीसाठी घेतले कर्ज फिटत नसल्याने नागेश हा नैराश्यात होता.आज पहाटे नागेश हा त्याच्या
शेतात गेला होता.परंतु त्याला येयला उशीर झाल्याने वडील भिकाशी नाईकवाडे हे शेतात गेले तेव्हा गोठ्यात नागेश अत्यावस्थेत आढळून आला .गरिबी व नापिकी यामुळे विषारी द्रव घेतल्याने त्याने वडिलांना सांगितले.दरम्यान त्यांनी तातडीने नागेश यास जिल्हा रुग्णालया उपचारासाठी दाखल केले.तिथे वैद्यकीय अधिकऱ्यांने त्यास मयत घोषित केले.नागेश हा अविवाहीत होता.भिकाजी आणा नाईकवाडे यांच्या खबरेवरुन रुग्णालयात चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.