मुंबई दि१३ :- : राज्यात जसे पावसाळ्याचे वेध लागतात तसे वारकरी संप्रदायाला आषाढीचे वेध लागतात. वारकरी संप्रदायातील चार वारींपैकी एक आषाढी वारी महत्त्वाची मानली जाते आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर विसरून या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना “माउली-माउली” ची हाक देतात, हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणार्यांचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात घाटकोपर प्रगती मंच व्हाट्स अप ग्रुप बनवणारे पत्रकार प्रशांत बढे यांनी घाटकोपर मधील सर्व राजकीय , सामजिक , कला , क्रीडा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना तसेच युवकांना एकत्र करून या ग्रुपची स्थापना केली .तसेच आजपर्यंत ग्रुप तर्फे खूप असे सामजिक कामे केली गेली आहेत .आणि यापुढे ही असेच कामे चालू राहणार आहेत .
आषाढी एकादशी निम्मित उपवासाचे फराळ, फळ आणि तुळसी रोप वाटप या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. हे फराळ वाटपाचे तिसरे वर्ष होते. सोशल मीडियातून सोशल वर्क या उद्देशाने सुरू केलेल्या या ग्रुप मधून आणखी एक उपक्रम अतिशय उत्तम पद्धतीने, उत्तम नियोजनाने पार पडला.या मध्ये सर्व सदस्य , उपस्थित मान्यवर यांनी घेतलेले परिश्रम केलेली मदत, दिलेल्या देणगी आणि महत्त्वाचा म्हणजे दाखविलेला विश्वास याच मुळे आपण हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो हजारो नागरिकांच्या मुखी आज हे फराळ आणि फळे पोहचू शकलो हीच आपली वारी समजुया….शेवटी कर्ता करविता ईश्वर असला तरी चांगल्या उद्देशाने केलेले कार्य हे यशस्वी होतेच. असेच घाटकोपर च्या प्रगती साठी, ऐकतेसाठी एकत्र येऊन कार्य करीत राहू, सोशल मीडियाचा एक ग्रुप काय काय करू शकतो? हे आपण सर्वांनी या उपक्रमातून दाखवून दिलेच आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी